Ad will apear here
Next
‘लायन्स क्लब्ज’तर्फे १४७ गरजू रुग्णांचे कृत्रिम पायरोपण


पुणे : दी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज डिस्ट्रिक्ट ३२३४ डी टू यांच्या वतीने व अहमदाबाद येथील राजस्थान हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित दोन मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फुट) शिबिरात १४७ रुग्णांना कृत्रिम पाय बसविण्यात आले. याचबरोबर ५३ पोलिओ कॅलिपर्स, २५० पेक्षा जास्त सिंगल स्टिक, नीकॅप, सर्जिकल बूट, कुबड्या व कंबरपट्टा आणि दोन व्हीलचेअर व एक तीनचाकी सायकलचे वाटपही या वेळी करण्यात आले.

सॅलिसबरी पार्क येथील महावीर प्रतिष्ठान येथे पाच व सहा जानेवारी २०१९ या दोन दिवशी आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उद्घाटन लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते झाले. या वेळी उपप्रांतपाल अभय शास्त्री, जयपूर फूटचे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन दीपक शेटिया, राजेंद्र गोयल, वीरेंद्र पटेल, शरद पवार, प्रवीण ओसवाल, तुषार मेहता, सतीश राजहंस, सुनील शेटिया आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी रमेश शहा म्हणाले, ‘सामाजिक सेवेत लायन्स क्लब नेहमीच पुढाकार घेत असून, हे ५३ वे शिबिर होत आहे, याचा आनंद वाटतो. समाजातील गरजूंना, वंचित घटकांना चांगल्यारितीने आयुष्य जगता यावे, यासाठी ‘लायन्स’चे सर्व पदाधिकारी नेहमी प्रयत्नशील असतात. लायन हसमुख मेहता यांनी जयपूर फुट शिबिराची सुरुवात केली. आज हजारो दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम लायन्स क्लबने केले आहे.’

दीपक सेठिया म्हणाले, ‘यंदाच्या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास ५०० लोकांनी याचा लाभ घेतला. फाटलेले किंवा विद्रुप असलेल्या ओठ, कान व नाक यावर मोफत शल्य चिकित्सा शिबिरातही रुग्णांनी सहभाग घेतला. हे शिबिर संपूर्णतः मोफत होते. बाहेरगावच्या रुग्णांच्या राहण्याची व जेवणाची मोफत सोय करण्यात आली होती. आमच्या सर्व स्वयंसेवकांनी अतिशय चांगले नियोजन केले.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZUCBW
Similar Posts
पुण्यात मोफत कृत्रिम पायरोपण शिबिराचे आयोजन पुणे : ‘दी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज डिस्ट्रिक्ट ३२३४ डी टू यांच्यातर्फे व अहमदाबाद येथील राजस्थान हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फूट), पोलिओ कॅलिपर्स, सिंगल स्टिक, नीकॅप, सर्जिकल बूट, कुबड्या व कंबरपट्टा वाटप शिबिर आयोजित केले आहे. पाच व सहा जानेवारी २०१९ रोजी सकाळी ९
गोवर व रुबेला लसीकरण जागृतीसाठी ‘लायन्स’चा पुढाकार पुणे : ‘केंद्र सरकारने हाती घेतलेल्या गोवर व रुबेला लसीकरण (एमआर) या महत्त्वाकांक्षी मोहिमेला समाजातील सर्व स्तरांत पोहोचवण्यासाठी लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल संघटनेतर्फे पुढाकार घेतला आहे. नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटांतील बालकांना ही लस देण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ‘लायन्स क्लब्ज’ विविध माध्यमांतून जागृती
‘लायन्स’तर्फे पोलिसांसाठी श्रमपरिहार केंद्र पुणे : गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडावी, यासाठी अहोरात्र बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना घरचे जेवण मिळावे, यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबागतर्फे लक्ष्मी रस्त्यावरील रांका ज्वेलर्स येथे श्रमपरिहार केंद्र उभारण्यात आले आहे.
‘लायन्स क्लब’कडून २८ टन निर्माल्य संकलन पुणे : लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या डीस्ट्रीक्ट ३२३४ डी दोनच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान तब्बल २८ टन निर्माल्य संकलन करण्यात आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language